| लोकजागर | फलटण | दि. 17 नोव्हेंबर 2025 |
फलटण नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून अरुण खरात यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी ते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले.
अर्ज दाखल करताना भाजपचे फलटण तालुका अध्यक्ष अमित रणवरे हेही त्यांच्या सोबत उपस्थित होते. अर्ज दाखल प्रक्रियेनंतर समर्थकांनी खरात यांचे अभिनंदन करत आगामी निवडणुकीत त्यांना भरभरून पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली.
शहरातील निवडणूक रंगत वाढत असताना प्रभाग १२ मधील ही उमेदवारी चर्चेचा विषय ठरत आहे.
