प्रभाग ९ मधून युवराज पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

| लोकजागर | फलटण | दि. १७ नोव्हेंबर २०२५ |

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून युवराज पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांचे समवेत ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्यासह कुटुंबीय व समर्थक उपस्थित होते.

युवराज पवार हे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना नेहमीच आवाज देत असतात. तसेच महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी सातत्याने समाजकार्याला प्राधान्य दिले आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर पवार यांनी “प्रभागातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी काम करण्याचा निर्धार” व्यक्त केला.

Spread the love