दत्त जयंतीनिमित्त कु. सिद्धाली शहा यांनी दिल्या यात्रेकरुंना शुभेच्छा

। लोकजागर । फलटण । दि. 4 डिसेंबर 2025 ।

श्री दत्त जयंती उत्सवात सहभागी होण्यासाठी फलटण शहरातून बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर यात्रेसाठी निघालेल्या भाविक भक्तांना कु. सिद्धाली अनुप शहा यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी भाविकांप्रती आदर व्यक्त करत यात्रेतील त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

प्रामुख्याने महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर येथे दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. पाटोदा तालुक्यात असलेले एक महत्त्वाचे धार्मिक ठिकाण असून हे ठिकाण दत्तप्रभूंच्या भोजनस्थानाचे स्थान मानले जाते आणि तेथे चक्रधर स्वामींचे स्थान देखील आहे. अशा या धार्मिक स्थळी दर्शसाठी दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला फलटण शहरातून सुमारे 44 भाविक रवाना झाले. यावेळी अ‍ॅड. नरसिंह निकम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कु. सिद्धाली शहा यांच्यासह भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी अशोकराव जाधव, सौ. स्वाती फुले आणि अनुप शहा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

कु. सिद्धाली शहा या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत असतात. पांचाळेश्वर येथे जाणार्‍या भाविकांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

Spread the love