१९ तारखेला रात्री १० वाजल्यापासून जाहीर प्रचार बंद

। लोकजागर । फलटण । दि. 17 डिसेंबर 2025 ।

येत्या २० तारखेला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक प्रचाराचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. निवडणूक नियमावलीनुसार, १९ तारखेला रात्री १० वाजल्यापासून जाहीर प्रचारावर बंदी येणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव यांनी दिली आहे.

मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले की, १९ तारखेला रात्री १० वाजेनंतर जाहीर सभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकांचा (लाऊडस्पीकर) वापर करण्यास सक्त मनाई असेल. याच वेळेपासून निवडणूक प्रचाराशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींची प्रसिद्धी आणि प्रसारण देखील पूर्णपणे बंद करावे लागणार आहे.

Spread the love