| लोकजागर | फलटण l दि. २१ डिसेंबर २०२५ |
फलटण नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा ६०० मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीअखेर ही आघाडी कायम राहिली. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रतिष्ठेच्या या लढतीत अखेर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी यांच्या युतीने बाजी मारली आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला आहे.
नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत उमेदवारनिहाय एकूण मते
समशेरसिंह नाईक निंबाळकर १६,४८९
श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर १५,८८९
नोटा ३४१
