साहित्य संमेलन स्पर्धांत फलटणचा डंका! ज. तु. गार्डे, वनिता गायकवाड, वसंत जाधव यांच्यासह जिल्हयातील गुणवंतांनी गाजवले मैदान

। लोकजागर । सातारा । दि. २४ डिसेंबर २०२५ ।

साताऱ्यात १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत फलटण तालुक्याने विशेष छाप पाडली असून, जि. प. शाळा हिंगणगाव येथील ज. तु. गार्डे यांनी वक्तृत्व स्पर्धेत (शिक्षक गट) जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच निबंध स्पर्धेत फलटणच्या सौ. वनिता वर्धमान गायकवाड (द्वितीय) आणि कथाकथन स्पर्धेत वसंत पांडुरंग जाधव (तृतीय) यांनी घवघवीत यश मिळवले आहे.

जिल्हाभरातील ५ गटांत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत शिक्षक गटात खटावच्या दीपाली जाधव प्रथम, तर साताऱ्याच्या सौ. सुषमा मोरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ९ ते १२ वी गटात महाबळेश्वरची स्वप्नाली बिराणे प्रथम, वाईची ईश्वरी थोरवे द्वितीय आणि साताऱ्याची अक्षता चव्हाण तृतीय आली. ६ वी ते ८ वी गटात साताऱ्याची अनुष्का मडके प्रथम, जावलीची निधी रांजणे द्वितीय आणि खटावचा शार्विल राजमाने तृतीय ठरला. महाविद्यालयीन गटात खंडाळ्याची अर्जुन प्रीती दत्तात्रय हिने यश मिळवले.

वक्तृत्व स्पर्धेत शिक्षक गटात वाईच्या तृप्ती मोहिते यांनी द्वितीय तर खटावच्या सचिन गोसावी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ९ ते १२ वी गटात वाईची वेदिका माळी प्रथम, साताऱ्याची वैष्णवी येवले द्वितीय आणि जावलीचा आदित्य भिलारे तृतीय आला. ६ वी ते ८ वी गटात कराडची वेदिका भोसले प्रथम, खटावची कावेरी घाडगे द्वितीय आणि पाटणची पूजा देसाई तृतीय ठरली. स्वरचित कविता स्पर्धेत खंडाळ्याचे पोपट कासुर्डे प्रथम, वाईच्या तृप्ती मोहिते द्वितीय आणि खटावच्या रंजना सानप व कराडच्या राणी जगताप यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला.

कथाकथन स्पर्धेत शिक्षक गटात साताऱ्याचे अमितकुमार शेलार प्रथम आणि सौ. रंजना सानप द्वितीय ठरले. ९ ते १२ वी गटात साताऱ्याची प्रियांका मारकड प्रथम, विंगची हितेशनी महांगडे द्वितीय आणि वाईची स्वराली पिसाळ तृतीय आली. ६ वी ते ८ वी गटात साताऱ्याची ईरा दीक्षित प्रथम, पूर्वा चिकणे द्वितीय आणि पाटणची तनुजा लागवे तृतीय ठरली. चित्रकला स्पर्धेत जावलीचे पीयूष गायकवाड प्रथम, साताऱ्याचे श्रीकांत जाधव द्वितीय आणि खटावचे बी. जी. धर्माधिकारी तृतीय आले. महाविद्यालयीन चित्रकला स्पर्धेत साताऱ्याचे यश डुंबरे (प्रथम), वैभवी मुळे (द्वितीय) आणि खंडाळ्याची साक्षी माळी (तृतीय) यांनी बाजी मारली. ९ ते १२ वी गटात साताऱ्याची सानिका फडतरे प्रथम तर ६ वी ते ८ वी गटात साताऱ्याचा समर्थ पवार प्रथम ठरला.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धांच्या माध्यमातून साताऱ्याच्या शैक्षणिक वैभवाचे दर्शन घडले आहे. स्वागताध्यक्ष ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Spread the love