दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते श्री सदगुरु व महाराजा संस्था समूहाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

। लोकजागर । फलटण । दि. 16 जानेवारी 2026 ।

फलटण येथील श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या सन 2026 च्या आकर्षक दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदगुरु व महाराजा संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महाराजा मल्टिस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजीतसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. याप्रसंगी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन राजाराम फणसे, संचालक प्रभाकर भोसले, संचालक अमोल सस्ते, निलेश मोरे, दिपराज तावरे, शितल अहिवळे, सरव्यवस्थापक संदीप जगताप आणि संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि संस्कृती यांचे दर्शन घडवणारी ही दिनदर्शिका अत्यंत सुबक आणि आकर्षक रंगात साकारण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची जयंती, पुण्यतिथी यासह हिंदू पंचांगाप्रमाणे विविध मुहूर्त आणि धार्मिक माहितीचा समावेश करून ती अधिक उपयुक्त बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानाच्या तळाशी संस्थेच्या विविध ठेव योजना, आकर्षक व्याजदर तसेच सदगुरु व महाराजा संस्था समूह आणि स्वयंसिद्धा महिला संस्था समूहातील विविध संस्था व प्रमुख पदाधिकार्‍यांची माहिती देण्यात आली आहे.

प्रकाशन सोहळ्यादरम्यान चेअरमन तेजसिंह भोसले यांनी संस्था समूहाच्या आर्थिक प्रगतीचा अहवाल सादर केला. ‘‘मार्च 2025 अखेर संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असून, संस्थेचे एकूण वसूल भागभांडवल 4 कोटी 54 लाख 63 हजार रुपये इतके आहे. संस्थेकडे 193 कोटी 33 लाख रुपयांच्या ठेवी जमा असून, 155 कोटी 42 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच 65 कोटी 47 लाख रुपयांची गुंतवणूक आणि 2 कोटी 66 लाख रुपयांचा नफा संस्थेने मिळवला असून, समूहाचे खेळते भांडवल 160 कोटी 44 लाख रुपयांवर पोहोचले आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना तातडीने सहकार्य करणे आणि सभासद, ठेवीदार व कर्जदारांना दर्जेदार सेवा देणे, हेच या संस्था समूहाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे’’, तेजसिंह भोसले यांनी अधोरेखित केले.

Spread the love