। लोकजागर । सातारा । दि. ०३ फेब्रुवारी २०२५ ।
भारत सरकारच्या राष्टीय युवा कोर योजनेअतंर्गत नेहरु युवा केंद्र सातारा मार्फत “डिजिटल कृषि मिशन” कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक भरती करण्यात येत आहे.या पदासाठी उमेदवार हा किमान पदवी शिक्षण घेत असावा किवा पदवीधर, पदव्युत्तर पदवी धारक असावा. त्याचे वय १ जानेवारी २०२५ रोजी किमान १८ वर्ष व कमाल २९ वर्ष पुर्ण असावे. ज्या तालुक्यातुन उमेदवार अर्ज करणार आहे त्या तालुक्याचा तो रहिवासी असावा,तसेच या पदावर त्याने पुर्वी काम केलेले नसावे.या पदाकरीता एकुन जागा जिल्हयात ३३ प्रत्येक तालुक्यात ३ जागा व मानधन प्रत्येकी ५००० हजार कालावधी किमान १५ दिवस व जास्तीत जास्त तीन महिने असा राहील.
या योजनेबाबत सविस्त्र माहिती तसेच ऑनलाईन अर्जाबाबत https://.nic.in/nycapp/main.acp या सकेंतस्थळावर भेट देवुन ऑनलाईन अर्ज ८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा युवाअधिकारी नेहरु युवा केंद्र सातारा यानीं केले आहे,