। लोकजागर । फलटण । दि. 0५ फेब्रुवारी २०२५ ।
फलटण व कोरेगाव तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व कोरेगाव प्रकल्पातील रिक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक महिलांनी 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय फलटण व कोरेगाव येथे सादर करावेत.
फलटणव कोरेगाव तालुक्यातील होणारी पदभरती ही शासन निर्णयाच्या अधिन राहून व गुणवत्तेच्या निकषाधारेच होईल. त्या मुळे अर्जदारांनी वशिलेबाजी किंवा इतर कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. सदर पद भरती संदर्भात आपल्याला कोणत्याही गोष्टीची मागणी केली गेल्यास तात्काळ या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय फलटण व कोरेगाव येथे संपर्क साधावा.