। लोकजागर । सातारा । दि. 0५ फेब्रुवारी २०२५ ।
सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये विविध प्रकारच्या कार्य प्रशिक्षणाची संधी या विभागाच्या वेबपोर्टल वर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. या संधीचा जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजका केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
उमेदवारांची वयोमर्यादा किमान वय १८ व कमाल ३५, तसेच किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर (शिक्षण चालू असलेले उमेदवार, NAPS/ MAPS उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत), विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन आपली प्रोफाईल अद्यावत करुन या विभागाच्या वेब पोर्टलवर सातारा जिल्हयातील शासकीय,निमशासकिय, खाजगी आस्थापना, पतसंस्था, बँका, शैक्षणिक संस्था इ. यांनी कार्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन रिक्त पदांची मागणी केली आहे अशा रिक्तपदांना अर्ज करुन या योजनेचा लाभा घ्यावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी आस्थापनांनी आपल्याकडील प्रशिक्षणार्थीसाठीची रिक्तपदे शासन निर्णयानुसार पोर्टलवर अधिसुचित करण्यासाठी या कार्यालयाशी संपर्क करावा. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा असेही आवाहन सहायक आयुक्त श्री. पवार यांनी केले आहे.