पहिल्या छायाचित्रात कु. समृद्धी सुनिल घोलप व दुसर्या छायाचित्रात रुद्र विलास नेरकर यांचे अभिनंदन करताना अॅड. सौ. मधुबाला भोसले. सोबत प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश पाठक, ज्येष्ठ शिक्षक सलीम शेख, राजेंद्र सस्ते, क्रीडाशिक्षक संदीप ढेंबरे, कबड्डी कोच तुषार करचे.
। लोकजागर । फलटण । दि. २२ फेब्रुवारी २०२५ ।
श्री सदगुरु शिक्षण संस्था संचलित सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण ची विद्यार्थिनी समृद्धी सुनील घोलप हिची ३५ व्या किशोरी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाली असून सातारा जिल्हा अॅमेझॉन अॅथलेटिक्स असोसिएशन सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेमध्ये रुद्र विलास नेरकर या विद्यार्थ्यांचा दुसरा क्रमांक आला असून त्याची राज्य स्तरावरील गोळा फेक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा पंढरपूर येथे होणार आहेत. या दोघांचा घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या सचिव अॅड. सौ. मधुबाला भोसले यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री. सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, सचिव अॅड. सौ.मधुबाला भोसले, प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश पाठक, सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.