२३, २४ व २५ मे रोजी जी.डी.सी.अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा; अर्ज भरण्यासाठी ७ मार्च पर्यन्त मुदतवाढ

। लोकजागर । सातारा । दि. २५ फेब्रुवारी २०२५ ।

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी.अॅण्ड ए. बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.अँड ए.) परीक्षा-२०२५ व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परीक्षा-२०२५, दिनांक २३, २४ व २५ मे, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.

जी.डी.सी. अॅण्ड ए. व सी. एच. एम. परीक्षा २०२५ साठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ७ मार्च , रात्री ८  वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.१३ मार्च  रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत करण्यात आलेली आहे, असेही श्री. सुद्रिक यांनी कळविले आहे.

Spread the love