। लोकजागर । सातारा । दि. २८ फेब्रुवारी २०२५ ।
श्रीरामकृष्ण विवेकानंद भाव प्रचार परिषद महाराष्ट्र यांच्यातंर्गत कार्यरत असलेल्या श्रीरामकृष्ण सेवा मंडळ यांच्यावतीने श्रीरामकृष्ण आश्रमात श्री रामकृष्ण परमहंस यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मार्च ते ३ मार्च दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत.
शनिवार दि. १ मार्च रोजी प्रात:स्मरण, विशेष पूजा, हवन, जपयज्ञ, आरती, प्रसाद, भजने, श्रीरामकृष्णनाम संकीर्तन, आरती, प्रसाद. रविवार दि.२ मार्च रोजी युगधर्म प्रतिष्ठाता भगवान श्रीरामकृष्ण या विषयावर कोल्हापूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी बुध्दानंदजी महाराज यांचे सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यान होणार आहे. सोमवार दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता नृत्यरचना कार्यक्रम होणार आहे. श्रीरामकृष्णार्पणम या विषयावर श्री सारदा भरतनाट्यम नृत्य संस्थेचेच्या संचालिका सौ. पूजा जाधव हे सादरीकरण करणार आहेत.

या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीरामकृष्ण सेवा मंडळाचे अध्यक्ष रमणभाई शहा, नंदकुमार सावंत, डॉ. शैला कापरे, प्रसाद पवार, आशिष दळवी, हेमंत गुजर आणि सदस्य राजेंद्र जाधव, अनिरुध्द कोकाटे, मिलिंद तळवलकर, पंकज भोसले, नरेश जाधव यांनी केले आहे.