मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

। लोकजागर । सातारा । दि. १० मार्च २०२५ ।

मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. यंदा त्याचे १४ वे वर्ष असून त्यानिमित्त अभिवाचन आणि काव्य लेखन  स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ मराठी भाषा पंधरवड्याच्या समारोपप्रसंगी म्हणजे दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू कलामंदिर येथे होणार असल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

अभिवाचन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमणे – प्रथम – सौ. स्मीता बाळकृष्ण भोसले,  द्वितीय (विभागून) भारत जिवन प्रभुखोत, सौ. सपना डफळे,  तृतीय (विभागून) निलेश महिगांवकर, सौ. अनिता जाधव, उत्तेजानार्थ – प्रचतेस काळमेख, स्वानंद जोशी, श्रेया श्रीपाद गोलिवडेकर. काव्य लेखन स्पर्धेत प्रथम- सौ.मनिषा गजानन शिरटावले,  द्वितीय – रोहित जोशी, तृतीय सौ.नीता वझे, उत्तेजनार्थ -रुपाली सदाशिव भोस, उत्तेजनार्थ -ॲड. संगिता श्रीकांत केंजळे यांनी क्रमांक पटकावला. विजेत्यांना दि. १६ मार्च रोजी शाहू कलामंदिर येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तरी विजेत्यांनी दि.१६ मार्च रोजी उपस्थित रहावे असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.

Spread the love