बाळासाहेब वेलणकर यांचे दु:खद निधन

। लोकजागर । फलटण । दि. १२ मार्च २०२५ ।

शहरातील शंकर मार्केट परिसरातील भैरोबा गल्ली येथील रहिवासी, जुन्या काळातील इलेक्ट्रीकल काँन्ट्रॅक्टर सूर्यकांत उर्फ बाळासाहेब वेलणकर (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी राहत्या घरी निधन झाले.

सातारा जिल्ह्यातील जुन्या काळातील सर्वात पहिले इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते सर्वत्र सुपरिचित होते.

त्यांच्या पश्‍चात अनिल व अतुल ही दोन मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर आज सायंकाळी ५ : ०० वाजता फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

Spread the love