। लोकजागर । सातारा । दि. २१ मार्च २०२५ ।
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यावतीने शनिवार 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ परिकाम्य लेख अधिनियमाची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार अपघात दावा प्रकरणे आदी प्रकरणे अदालतसमोर ठेवण्यात आली आहे. यात न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबीत तसेच वाद दाखल पूर्व प्रकरण दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी 22 मार्च रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीसमोर मोठया प्रमाणात प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी केले आहे.
0000
All reactions:
66