। लोकजागर । सातारा । दि. २३ मार्च २०२५ ।
युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मर्ढे (ता.जि.सातारा)येथे मसाप, पुणे शाहुपुरी शाखेतर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मसाप, पुणेचे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, मसाप, पुणे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, यमर्ढेचे सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, अंजिक्यातारा कारखान्याचे संचालक नितीन पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मसाप, पुणेचे प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार म्हणाल्या, त्यांनी केलेले साहित्यातील कार्य उलघडले असते तर त्यांना नोबल पुरस्कार मिळाला असता. त्यांच्या साहित्याची अनेक वैशिष्ट्ये असून त्यांच्या जीवनाबद्दल माहितीही त्यांनी सांगितली.

रवींद्र बेडकिहाळ यांनी मर्ढे हे गाव कवितेचे गाव व्हावे याकरता शासन स्तरावर कशाप्रकारे प्रयत्न करावेत याबद्दल सांगितले आणि त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस कुलकर्णी यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत मर्ढेकर स्मारकांच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगत मर्ढे गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांंना धन्यवाद दिले.
ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच विक्रम शिंगटे यांनी अभिवादन करत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरीच्या कार्याचे कौतुक करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन अमर बेंद्रे तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले.
याप्रसंगी आर.डी. पाटील, सचिन सावंत, संजय माने, सतीश घोरपडे, तुषार महामूलकर, मर्ढे विकास सोसायटीचे चेअरमन गणेश शिंदे, मर्ढेकर प्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.