मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. ०१ एप्रिल २०२५ ।

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व बुद्धिमत्ता प्रभलगतेसाठी स्कॉलरशिपच्या धर्तीवरती मुधोजी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यातील गुणवत्ताप्राप्त २१ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर उपस्थित होते.

यामध्ये इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक चि. जाधव ओमराजे संदीप, मुधोजी हायस्कूल फलटण.कु. जाधव प्रांजल ज्ञानेश्‍वर ,श्रीमंत सगुनामाता विद्यालय दालवडी. द्वितीय क्रमांक चि. रोकडे देवदत्त अमोल ,मुधोजी हायस्कूल फलटण तृतीय क्रमांक चि. साळुंखे शिवरत्न निलेश, श्री संत ज्ञानेश्‍वर माध्यमिक विद्यालय नांदल.


इयत्ता सहावी प्रथम क्रमांक कु. गोफणे वेदांगी संजय, मुधोजी हायस्कूल फलटण कु. भंडलकर स्नेहा योगेश, मुधोजी हायस्कूल फलटण द्वितीय क्रमांक कु. बनकर प्रगती विठ्ठल, मुधोजी हायस्कूल फलटण तृतीय क्रमांक चि. भापकर आयुष हिंदुराव ,मुधोजी हायस्कूल फलटण कु. चौधरी अनुश्री विकास मुधोजी हायस्कूल फलटण चि. निंबाळकर आरुष युवराज ,मुधोजी हायस्कूल फलटण कु. गायकवाड स्वराली पंकज ,मुधोजी हायस्कूल फलटण.


इयत्ता सातवी प्रथम क्रमांक चि. दोषी सर्वेश अभिषेक ,मुधोजी हायस्कूल फलटण, द्वितीय क्रमांक कु जगताप इशिता सतीश , मुधोजी हायस्कूल फलटण तृतीय क्रमांक चि.कलाल श्रीराज राजेंद्र, मुधोजी हायस्कूल फलटण.


इयत्ता आठवी प्रथम क्रमांक कु. अबदागिरे आर्या हेमंत ,मुधोजी हायस्कूल फलटण, द्वितीय क्रमांक चि.रणवरे अर्जुन अजित , मुधोजी हायस्कूल फलटण द्वितीय क्रमांक चि धुमाळ सोहम विकास ,मुधोजी हायस्कूल फलटण तृतीय क्रमांक कु. मनेर जरीन अलीम, मुधोजी हायस्कूल फलटण.


इयत्ता नववी प्रथम क्रमांक चि. येळे तन्मय संभाजी, मुधोजी हायस्कूल फलटण द्वितीय क्रमांक चि .भुजबळ ओंकार रवींद्र, मुधोजी हायस्कूल फलटण तृतीय क्रमांक कु. कापसे सिद्धी अविनाश, ज्योतिर्लिंग हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पवारवाडी या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांचा समावेश होता.


यावेळी प्रमुख उपस्थितानमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम, फलटण एज्युकेशन सोसायटीचे तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंत शेडगे, श्री संत ज्ञानेश्‍वर माध्यमिक विद्यालय नांदलचे मुख्याध्यापक शिवाजी काळे, ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडीचे मुख्याध्यापक अण्णा ननावरे, श्रीमंत सगुणा माता विद्यालय दालवडीच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य नितीन जगताप, मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, मुधोजी हायस्कूलच्या पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Spread the love