शोक सभेत मान्यवरांनी व्यक्त होत वाहिली श्रद्धांजली
| लोकजागर | फलटण | दि. २५ जुलै २०२५ |
“धाडसी व निर्भीड पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या अचानक निधनाने निर्माण झालेली पोकळी येणारा काळच भरून काढू शकतो. आढाव कुटुंबीयांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे असून त्यांच्या निधनाने पत्रकार व सामाजिक क्षेत्रात मोठी हानी झाल्याचे”, मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शोकसभेचे आयोजन येथील महाराजा मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या शोकसभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून प्रा. रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, जेष्ठ साहित्यिक तानाजीराव जगताप, प्राचार्य सुधीर इंगळे, प्राचार्य रवींद्र येवले, दादासाहेब चोरमले, शिवसेना तालुकाप्रमुख नानासो तथा पिंटू इवरे, डॉ. जे. टी. पोळ, डॉ. बी आर आंबेडकर आय. आय. टी.चे शेखर कांबळे, प्रा.रवींद्र कोकरे, प्रा. सतीश जंगम, ज्येष्ठ पत्रकार स. रा. मोहिते, सचिन मोरे, कामगार संघर्ष संघटनेचे सनी काकडे, प्रदीप झणझणे, श्रीमती कांताबाई काकडे, भाजपा तालुका प्रमुख अमित रणवरे, सौ. सुपर्णा अहिवळे आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

शोकसभेस सौ. मनीषा कांबळे, ओबीसी नेते बापूराव काशीद, संजय देशमुख, ह. भ. प. नवनाथ कोलवडकर, मंगेश आवळे यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी दिवंगत प्रा. रमेश आढाव यांच्या प्रतिमेला त्यांच्या पत्नी श्रीमती वंदना आढाव, त्यांचे चिरंजीव ऋषिकेश आढाव, सून सौ. उन्नती आढाव, विवाहित मुलगी सौ. तेजस्विनी काकडे, जावई मनोज काकडे, जेष्ठ बंधू विलास आढाव यांच्या सह उपस्थितांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
तत्पूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी आढाव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.