। लोकजागर । फलटण । दि. 21 सप्टेंबर 2025 ।
मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेचा पंधरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे (मामा) यांनी मनोगत व्यक्त करताना शासनाच्या उदासीन धोरणाबद्दल खंत व्यक्त केली.

मोरे मामा म्हणाले, “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून गेली पंधरा वर्षे संस्था बेघर, मानसिक संतुलन बिघडलेले व निराधार नागरिक यांची मनोभावे सेवा करत आहे. मात्र या लोकांसाठी निवारा उभारण्यासाठी आवश्यक शासकीय जागा केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच जिल्हाधिकारी व नगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे बेघरांना अधिक सुलभ व सुटसुटीत सेवा देता येत नसल्याची खंत आहे.*
या कार्यक्रमात फलटण तालुक्यातील पत्रकार बांधवांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी युवा जनमतचे पत्रकार युवराज पवार यांनी मनोगत व्यक्त करताना, पुढील काळात संस्थेला शासकीय जागा मिळवून देण्यासाठी सर्व पत्रकार बांधव प्रशासनाकडे पाठपुरावा करतील अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते बच्चुभाऊ मेहता, ज्येष्ठ पत्रकार पोपट मिंड, यशवंत खलाटे पाटील, योगेश गंगातीरे, प्रशांत रणवरे, अमोल पवार, आनंद पवार, प्रमोद सस्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी सत्कार सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे (मामा), सचिव सौ. निर्मला मोरे, खजिनदार अक्षय तावरे, सल्लागार अॅड. सौ. शारदा दिक्षित, सदस्य अनिल कुंभार, मोहन अलगुडे, रवींद्र भिसे, सौ. सुरेखा घाडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण (बापू) गायकवाड, अर्जुन राऊत, सौ. आलका कुंभार यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामस्थ व सभासदांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. शेवटी आभार प्रदर्शन करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
