अजित पवार यांच्या हस्ते अतुल शहा यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

। लोकजागर । फलटण । दि. 25 ऑक्टोबर 2025 ।

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ना. अजित पवार यांच्या हस्ते विमा व्यवसाय क्षेत्रातील प्रख्यात तसेच सामाजिक कार्यकर्ते अतुल माणिक शहा यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आ. सचिन पाटील उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल विविध स्तरांवरून अतुल शहा यांचे अभिनंदन होत आहे.

काही महिन्यांपूर्वी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अतुल शहा यांनी पक्षप्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेत पक्षाने त्यांना ही जबाबदारी दिली आहे.

दरम्यान सदर नियुक्तीबद्दल खा. नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, रामभाऊ ढेकळे, अनिल देसाई, मनोज देशमुख, पृथ्वीराज गोडसे, श्रीमंत शिवरुपराज खर्डेकर, राहुल निंबाळकर, विकास राऊत, मारुती टकले आदी मान्यवरांनी अतुल शहा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love