फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण : धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे करणार एसआयटी चौकशीची मागणी

। लोकजागर । फलटण । दि. 24 ऑक्टोबर 2025 ।

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत. ‘‘ती बीडची आणि मुंडे असल्याने तिच्या तक्रारींकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले असेल, तर हे अत्यंत गंभीर आहे’’, असं सांगत मुंडे यांनी या प्रकरणी स्वतंत्र एसआयटी चौकशी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या व मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी आणि जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी, असं मुंडे म्हणाले.
ते म्हणाले की, या संदर्भात उद्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र सादर करणार आहेत.

Spread the love