। लोकजागर । फलटण । दि. २१ नोव्हेंबर २०२५ ।
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक असलेले विकास बबनराव राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.
या नियुक्तीप्रसंगी फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील यांनी विकास राऊत यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी डी. के. पवार, रामभाऊ ढेकळे आणि अतुल शहा हे उपस्थित होते.
