फलटणमधील पहिले नेत्रतज्ञ डॉ. मेघशाम बर्वे यांचे निधन

| लोकजागर | फलटण | दि. १७ डिसेंबर २०२५ |

फलटण शहरातील पहिले नेत्रतज्ञ, उत्तम टेनिस खेळाडू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. मेघशाम दत्तात्रय बर्वे यांचे आज सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटणच्या वैद्यकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. बर्वे यांनी फलटणमध्ये नेत्ररोग उपचारांची पायाभरणी करत अनेक रुग्णांना दृष्टीदान केले. रुग्णांशी आपुलकीने वागणारे, नेहमी हसतमुख असलेले डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. टेनिसप्रेमी म्हणूनही ते शहरात परिचित होते.

त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी २.३० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

डॉ. मेघशाम बर्वे यांच्या निधनाने फलटणने एक सेवाभावी डॉक्टर आणि सुसंस्कृत नागरिक गमावला आहे.

Spread the love