सोशल मीडियावरील जाहिरातीवर विश्वास ठेवू नये – निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील
। लोकजागर । सातारा ।
सध्या सोशल मिडीयावर “राज्य महसुल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025” या शिर्षकाखाली कंत्राटी भरतीची माहिती दर्शविणारे एक पानाचे विवरण प्रसारित झाल आहे. या विवरणाचे अनुषंगाने अनेक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन प्रसारित विवरणाचे अनुषंगाने कंत्राटी भरतीबाबत विचारणा करीत आहेत. तथापि सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारची कोणतीही कंत्राटी भरतीची जाहिरात अथवा माहिती प्रसारित करण्यात आलेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.
प्रसारित झालेल्या माहितीशी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीवर विश्वास ठेवू नये अथवा त्यानुसार कोणतीही कार्यवाही करु नये. सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या अशा फसव्या, खोट्या, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवल्यामुळे नागरिकांची फसवणूक होऊन आर्थिक, शारिरिक व मानसिक नुकसान होऊ शकते, याची नोंद घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.