| लोकजागर | फलटण | दि. ३० जानेवारी २०२५ |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) फलटण तालुकाध्यक्षपदी सातारा जिल्हा बँकेचे संचालक तथा फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खरर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या सातारा येथील कार्यालयात राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या हस्ते श्रीमंत शिवरुपराजे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
याआधी श्रीमंत शिवरूपराजे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण पंचायत समितीचे सभापती हे प्रमुख राजकीय पद भूषवले होते. श्रीमंत रामराजेंशी झालेल्या राजकीय दुराव्यानंतर श्रीमंत शिवरूपराजे यांनी आपण थेट ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कार्यरत रहाणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता ना. अजितदादा पवार यांनी फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा श्रीमंत शिवरुपराजे यांच्याकडे सोपवल्याने; हा श्रीमंत रामराजे यांना मोठा धक्का मानला जात आहे.