‘लोकजागर’च्या न्यूज पोर्टलचा शुभारंभ

। लोकजागर । फलटण । दि. ०४ फेब्रुवारी २०२५ ।

येथील साप्ताहिक ‘लोकजागर’ या वृत्तपत्राच्या न्यूज पोर्टलचा शुभारंभ श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकजागर’चे संस्थापक, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांची उपस्थिती होती.

सन 1980 पासून ‘लोकजागर’ हे वृत्तपत्र साप्ताहिक स्वरुपात फलटण येथून प्रसिद्ध होत आहे. ‘वसा लोकजागृतीचा’ हे ब्रिद अंगिकारुन शिक्षण, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता आदी समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम ‘लोकजागर’ मधून नियमितपणे होत असते.

काळानुरुप झालेल्या माध्यम क्षेत्रातील बदलानुसार वृत्तपत्राबरोबरच ‘लोकजागर’ने डिजीटल माध्यमात या न्यूज पोर्टलद्वारे पदार्पण केले आहे. वाचकांना उपयोगी बातम्या, लेख आदींना व्यापक स्वरुपात प्रसिद्धी देण्याचे काम या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे यावेळी ‘लोकजागर टीम’ कडून सांगण्यात आले.

Spread the love