विंचूर्णीच्या अनिल निंबाळकर यांची राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

। लोकजागर । फलटण । दि. 0६ फेब्रुवारी २०२५ ।

केंद्रीय कस्टम्स अँड सेंट्रल जीएसटी विभागाचे सेवानिवृत्त सुपरिटेंडेंट अनिल तुकाराम निंबाळकर यांची टेबल टेनिस या खेळामध्ये महाराष्ट्राच्या वरिष्ठ गट संघामध्ये निवड झाली आहे. अनिल तुकाराम निंबाळकर मूळचे फलटण तालुक्यातील विंचूर्णी येथील आहेत. 

इंदूर येथे दि १७ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या 33 व्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनिल निंबाळकर हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.  

पुणे येथील डेक्कन जिमखाना यावर त्यांचा दैनंदिन सराव सुरू असतो. 

यापूर्वी सेवानिवृत्त होण्यापूर्वी १९७९ ते ८५ या कालावधीत आंतर जिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अनिल निंबाळकर यांनी सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 

अनिल निंबाळकर हे आपल्या अष्टपैलू खेळाबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Spread the love