जिल्हा परिषद मुलींची शाळा, लोणंद येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन प्रसंगी अजित जाधव, मुख्याध्यापिका सौ. छाया क्षीरसागर, विद्यार्थिनी व इतर.
जिल्हा परिषद मुलींची शाळा, लोणंद येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
। लोकजागर । फलटण । दि. 0७ फेब्रुवारी २०२५ ।
“विद्यार्थ्यांकरिता पालक, गुरुजन आणि महापुरुषांचा विचार व वारसा गुरुस्थानी असल्याचे”, प्रतिपादन सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव यांनी केले. त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद मुलींची शाळा लोणंद येथे अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
सुजन फाउंडेशन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समिती यांच्यावतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी त्यागमूर्ती रमाई आंबेडकर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ क्षीरसागर यांनी केले. सुजन फाउंडेशनच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर व रमाई या जीवन चरित्र पुस्तिकेचे विद्यार्थ्यांना वाचन चळवळ सुदृढ करण्यासाठी वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थीनींना अजित जाधव यांच्यावतीने भारतीय संविधान अमृत वर्षा निमित्ताने ‘संविधान प्रस्ताविका’ भेट देण्यात आली.
मुख्याध्यापिका सौ. छाया क्षीरसागर यांनी सुजन फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी सौ. मृणाल जाधव, सौ. स्वाती सरक, सौ. सारिका ढेंबरे, वनस्थळी कार्यकर्त्या रजनीताई शिंदे, पत्रकार निखिल राऊत उपस्थित होते. उपशिक्षक गणेश कांबळे यांनी सुजन फाउंडेशन व अजित जाधव यांच्या माध्यमातून थोर महापुरुषांच्या विचारांच्या प्रसार कार्याचे अभिनंदन केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.