। लोकजागर । फलटण । दि. ०८ फेब्रुवारी २०२५ ।
येथील बर्वे पॅथेलॉजी लॅबचे प्रमुख डॉ. महेश बर्वे यांच्या ‘‘मी’ चे मागणे’ या काव्यंसग्रहाचे प्रकाशन रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०४:३० वाजता डॉ. जोशी हॉस्पिटल, फलटणच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
सदरचा काव्यसंग्रह विद्यावैभव प्रकाशनकडून प्रकाशित करण्यात आला असून या प्रकाशन सोहळ्यावेळी काव्यसंग्रहातील निवडक रचनांचे संगितबद्ध सादरीकरण गायक व संगीतकार शंतनू पानसे हे करणार आहेत. या सादरीकरणाला अक्षय शेवडे तबला साथ देणार आहेत.
तरी या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. महेश बर्वे यांनी केले आहे.