| लोकजागर | फलटण | दि. १२ फेब्रुवारी २०२५ |
सासकल (ता.फलटण) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने ‘ऊस खोडवा पाचट व्यवस्थापन व सुपर केन नर्सरी’ या विषयावर शेतकर्यांना मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमास सासकल व परिसरातील ऊस उत्पादन शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शासनाचे कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी केले आहे.

या शिबीराबाबत सविस्तर माहिती देताना सचिन जाधव यांनी सांगितले आहे की, दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता वाघजाई मंदिर, सासकल (ता.फलटण) येथे आयोजित या शिबीरात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव चे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे व ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ. दत्तात्रय थोरवे यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. यावेळी फलटण तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, विडणी मंडळ कृषि अधिकारी शहाजी शिंदे, विडणीचे कृषी पर्यवेक्षक अजित सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.