बोडकेवाडीच्या शाम जाधव यांची महसूल सहाय्यक पदी निवड

। लोकजागर । फलटण । दि. १६ फेब्रुवारी २०२५ ।

बोडकेवाडी ता.फलटण येथील शेतकरी कुटुंबातील शाम जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

शाम जाधव यांचे प्राथमिक ते दहावी पर्यंतचे शिक्षण बोडकेवाडी व गिरवी येथे झाले. त्यांनी कृषी पदविका शिक्षण कराड येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची येथे पूर्ण केले. शेतकरी कुटुंबातील या मुलाने खडतर परिस्थितीत मोठया जिद्दीने हे यश संपादन केले आहे.

या यशानंतर गावकऱ्यांनी शामचे कौतुक केले. शिक्षणासाठी आई वडीलांनी घेतलेले काबाडकष्ट डोळ्यांपुढे ठेवून, तसेच चांगल्या मित्रांची संगत धरली म्हणूनच यश मिळाल्याची भावना शाम यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल बोडकेवाडी ( गिरवी) गावासह संपूर्ण पनवेल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचेच हे फळ आहे, असे मत परीसरातील शिक्षक, समाजसेवक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Spread the love