तीन दिवस विद्यार्थ्यांसाठी भरगच्च उपक्रम
। लोकजागर । फलटण । दि. २६ फेब्रुवारी २०२५ ।
‘सेवाभारती’ सातारा जिल्हा यांच्यावतीने ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प’, फलटण अंतर्गत येथील नवलबाई मंगल कार्यालयात तीन दिवसीय निवासी ‘विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर’ दिनांक 28 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 02 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. फलटण तालुक्यातील सुमारे 20 जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 5 वी ते 7 वी मधील 150 विद्यार्थी या शिबीराचा लाभ घेणार आहेत, अशी माहिती फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प प्रमुख राहुल उर्फ पोपटराव बर्गे यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष डॉ. मधुसुदन फणसळकर, सचिव हेमंत देशपांडे, प्रकल्प शिक्षक योगेश ढेकळे, कार्यक्रम व उपक्रम प्रमुख सुषमा काटे, सहप्रकल्प प्रमुख स्वानंद जोशी यांच्या मार्गदर्शनात व नियोजनात पार पडणार्या या शिबीराबाबत सविस्तर माहिती देताना बर्गे यांनी सांगितले की, दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता शिबीराचे उद्घाटन फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांच्या हस्ते होणार असून यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.
शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:45 वा. प्रदिप ढेकळे यांचा ‘वैज्ञानिक खेळ’ हा कार्यक्रम, दुपारी 2 ते 4 जालना पोलाद स्टील कंपनी यांचे तारांगण, सा.वंदना जोशी व स्वानंद जोशी यांचे ‘सण व विज्ञान’ या विषयावर तर डॉ.सौ.निलीमा दाते व प्रा. सौ. निलम देशमुख यांचे ‘किशोरवयीन मुलींना आहार’ विषयक मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 4:30 ते सायं. 5:30 प्रदिप मदने, अजिंक्य साळी, पवन बर्गे व सहकारी विविध खेळ घेणार आहेत. सायं. 6:30 ते 7:45 भारतमाता पूजनाचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या सौ. प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी नायब सुभेदार मनोज डंगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हवाईदलातील सेवानिवृत्त अधिकारी आनंदराव कदम यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर सायं.7:50 ते 8:30 तडवळे येथील ह.भ.प.कुमार महाराज यांचा अध्यात्मिक कथेचा कार्यक्रम तर रात्री 9:45 ते 10:30 शिंदेवाडी – खुंटे येथील ह.भ.प.कर्वे महाराज यांचा भजन व भारुडाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

शनिवार, दि. 1 मार्च रोजी पहाटे 5 ते 6 उद्बोधन, सकाळी 6:30 ते 7:15 स्वानंद जोशी, शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनात ‘अग्निहोत्र’, सकाळी 7:30 ते 8:30 सौ. राधिका नाळे यांच्या मार्गदर्शनात योगासन होणार आहे. सकाळी 9:45 ते 11:15 सौ.प्रियाताई बेंद्रे, प्रशांत धनवडे, सचिन भगत कार्यानुभव कार्यक्रम घेणार आहेत. सकाळी 11:30 ते 12:15 सेवानिवृत्त प्राचार्य रविंद्र येवले ‘स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 1:45 ते 3:45 स्वरुपवर्धिनी संस्था, पुणेच्यावतीने वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण, दुपारी 4 ते 4:45 शशिकांत बोराटे यांचा ‘गणितातील गमतीजमती’ कार्यक्रम, सायं.5:15 ते 6:15 अजिंक्य साळी, नीरज वैद्य, पवन बर्गे, प्रदिप मदने व सहकार्यांकडून विविध खेळ, सायं.6:30 ते 7:30 सचिनराव पंडित, प्रा.सौ.माधुरी दाणी व शिक्षक वृंदांकडून प्रश्नमंजूषा कार्यक्रम, सायं.7:45 ते 8:30 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक साहित्यावर मनोगते, रात्री 9:45 ते 10:45 सचिनराव पंडित यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
रविवार, दिनांक 2 मार्च 2025 रोजी पहाटे 5 ते 6 उद्बोधन, सकाळी 6:30 ते 8:30 प्रभात फेरी व विज्ञान दिंडी, सकाळी 9:15 ते 10:30 राजेंद्र खवळे यांचा विज्ञानातील छोटे – छोटे प्रयोग कार्यक्रम होणार असून सकाळी 10:45 ते 12:30 या वेळेत शिबीराचा समारोप कार्यक्रम लायन्स क्लब, फलटणचे अध्यक्ष जगदीश करवा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी सेवाभारतीचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ.मधुसुदन फळसाळकर, सेवाभारतीचे प्रांत शिक्षणआयाम प्रमुख अरुण केळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.
‘‘सन 2007 पासून फलटण तालुक्यात फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प अव्याहतपणे सुरु आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर इतर कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे ज्ञान वाढावे, सामाजिक जाणिवा निर्माण व्हाव्यात व तो आपल्या देशाचा भावी सुजाण नागरिक व्हावा, या उद्देशाने हे व्यक्तिमत्त्व विकास शिबार आयोजित केले असल्याचे’’, पोपटराव बर्गे यांनी स्पष्ट केले.