| लोकजागर | फलटण | दि. २७ फेब्रुवारी २०२५ |
फलटण तालुक्यातील तांबवे येथे गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ते गुरुवार दि. ६ मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वीणा व कलश पूजन समस्थ ग्रामस्थ तांबवे यांच्या हस्ते होणार आहे. रोज पहाटे ४ ते ६:०० वा. काकडा आरती, सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ , सकाळी ७:३० ते १०:३० वाजता व दुपारी ३ ते ५ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण वाचन तर संध्याकाळी ५ ते ६ प्रवचन व रात्री ९ ते १ १ किर्तन सेवा होणार आहे.

गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. सुशिलाताई दिक्षीत यांचे प्रवचन व ह.भ.प. प्रदीप महाराज नलवडे यांचे किर्तन, शुक्रवार दि. २८ फेबुवारी रोजी ह.भ.प. गणपत महाराज उबाळे यांचे प्रवचन व ह.भ.प. गोविंद महाराज नाईकवाडे यांचे किर्तन, शनिवार दि. १ मार्च रोजी ह.भ.प. आरतीताई गवळी यांचे प्रवचन व ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे यांचे किर्तन तर रविवार दि. २ मार्च रोजी ह.भ.प. प्रा. शशिकांत शिंदे यांचे प्रवचन तर ह.भ.प. कृष्णा महाराज राऊत यांचे किर्तन तर ३ मार्च रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज बिरादार यांचे प्रवचन ह.भ.प. हर्षलाताई मगर यांचे किर्तन तर ४ मार्च रोजी ह.भ.प. अनंत जोगदंड यांचे प्रवचन तर ह.भ.प. अमोल महाराज सुळ यांचे किर्तन तर ५ मार्च रोजी ह.भ.प. गंगाराम महाराज राऊत यांचे किर्तन होईल . दि.६ मार्च रोजी ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव यांचे काल्याचे किर्तन होईल. व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेणेचे आवाहन पारायण सोहळा संयोजकांनी केले आहे.