दत्तात्रय गाडेला अटक करुन फाशीची शिक्षा द्या; फलटणला निवेदनाद्वारे मागणी

दोन दिवसात अटक न झाल्यास नाना पाटील चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा

। लोकजागर । मुंबई । दि. २७ फेब्रुवारी २०२५ ।

स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला तात्काळ अटक करावी. त्याच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन फलटण प्रांताधिकारी विकास व्यवहारे यांना देण्यात आले. दोन दिवसात या आरोपीला अटक न झाल्यास फलटण शहरातील नाना पाटील चौक येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

पँ. अजित मोरे, पँ. लक्ष्मण काकडे, सुनिल पवार, राहुल गुंजाळ, राहुल शिलवंत, राजु पठाण यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ‘‘गेल्या दोन दिवसापूर्वी पुणे येथील स्वारगेट एस. टी. बस स्थानाकात काळीमा फासणारी घटना घडली आहे. घरी येण्यासाठी निघालेल्या तरूणीला एकटीला पाहून फसवून राक्षस ,सैतान दत्तात्रय गाडे या नराधमाने जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर बलत्कार केला. सदर घटनेचा समस्त बहुजन समाज जाहीर निषेध करत आहे. अशा विकृत, समाज घातकी सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी व सदर आरोपीस अजून दोन दिवसा मध्ये अटक न झाल्यास समस्त बहुजन समाज फलटण येथील क्रांती सिंह नाना पाटील चौक येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहे.’’

Spread the love