दि. ३ मार्च रोजी स्व. सुभाषराव शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण

। लोकजागर । फलटण । दि. २८ फेब्रुवारी २०२५ ।

फलटण तालुक्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे सोमवार, दिनांक ३ मार्च २०२५ रोजी प्रथम पुण्यस्मरण संपन्न होणार आहे.

स्व. सुभाषराव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शिंदेवाडी (ता.फलटण) येथील शुभ लॉन्स येथे सोमवार, दिनांक ३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.नम्रता महाराज कर्वे यांचे फुलांचे किर्तन होणार असून दुपारी १२ : ०५ वा पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या पुण्यस्मरणदिनी स्व. सुभाषराव शिंदे यांना आदरांजली वाहण्यासाठी सुभाषराव शिंदे यांचे सहकारी, कार्यकर्ते, स्नेही आदींनी उपस्थित रहावे, असे आवाहन फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक चेतन सुभाषराव शिंदे यांनी समस्त शिंदे परिवाराच्यावतीने केले आहे.

Spread the love