| लोकजागर | फलटण | दि. २८ फेब्रुवारी २०२५ |
पंढरपूर येथे दिनांक २३ व २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत फलटणचा राजवीर धीरज कचरे याने १० वर्षाखालील गटात १०० मीटर धावणे व ५० मीटर धावणे या क्रीडा प्रकारांमध्ये सलग तीन वर्ष सुवर्णपदक मिळविले, राजवीर कचरे हा गुणवान वेगवान धावपटू फलटण एज्युकेशन सोसायटी’च्या स्व.शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्या मंदिर, कोळकी ता.फलटण या ठिकाणी इयत्ता ४ थी मध्ये शिकत आहे.
या यशस्वी खेळाडूला फलटण एज्युकेशन सोसायटीचे मैदानी खेळाचे प्रशिक्षक राज जाधव , तायाप्पा शेंडगे, महाराष्ट्र पोलीस सचिन फाळके, धीरज कचरे, सौ.रुपाली कचरे यांनी मार्गदर्शन केले.

फलटणच्या या गुणवान वेगवान धावपटूचे महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण’चे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन’चे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषद माजी ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्या श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती, फलटण माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटी’चे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, स्व.शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्या मंदिर, कोळकी’च्या मुख्याध्यापिका सौ.प्रज्ञा काकडे, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व फलटण शहर व तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.