। लोकजागर । फलटण । दि. ३ मार्च २०२५ ।
आज सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा फलटण – खुंटे रोड, शिंदेवाडी येथील शुभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे.
मागील वर्षी अल्पशा आजाराने सुभाषराव शिंदे यांचे आकस्मिक निधन झाले. मागील पन्नास वर्षापासून त्यांचे सामाजिक आणि राजकीय कर्तृत्व असामान्य असे होते. फलटण तालुका दूध पुरवठा संघाचा उत्तम असा कार्यकाल आणि फलटण दूध पुरवठा संघाची शेतकऱ्यांशी समावेशक जडणघडण करून त्यांनी करून महाराष्ट्रात एक आदर्श सहकारी दूध पुरवठा संघ म्हणून फलटणच्या दुध पुरवठा संघाची ख्याती त्यांच्या कार्याने केली होती . तसेच मराठा क्रांती मोर्चा चे जेष्ठ समन्वयक आणि मार्गदर्शक म्हणून ही त्यांची ख्याती होती. आपल्या राजकीय कारकिर्दीत सदैव राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहून सामाजिक आणि राजकीय जडणघडण त्यांनी उत्तमरीत्या सांभाळली होती. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आपल्या कर्तुत्वाचा दबदबा निर्माण केला होता. त्यांचा राजकीय रुबाब आणि प्रशासकीय दबदबा अजूनही फलटणकरांच्या जनतेत मनामनात ठसलेला आहे.

अशा या स्वर्गीय लोकनेते सुभाषराव शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण शिंदेवाडी येथील शुभ लॉन्स या कार्यालयात ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह. भ.प.नम्रता महाराज कर्वे, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कीर्तनकार यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन त्यांना आदरांजली वाहण्यात येणार असून या भावपूर्ण कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांचे चिरंजीव, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चेतन सुभाषराव शिंदे यांनी केले आहे.