फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची सर्वाधिक आवक

। लोकजागर । फलटण । दि. ०४ मार्च २०२५ ।

फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात रविवार, दिनांक २ मार्च २०२५ रोजी गव्हाची सर्वाधिक आवक नोंदवली गेली. गव्हापाठोपाठ बाजरी व ज्वारीची आवकही लक्षणीय ठरली.

याबाबत बाजार समिती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गव्हाची ५२८ क्विंटल आवक झाली असून किमान २,३५० ते कमाल ३,०५० इतका प्रति क्विंटल दर या पिकाला मिळाला. बाजारीची ४४२ क्विंटल आवक झाली असून किमान रु.२,१०० ते कमाल रु. २,९०० इतका प्रति क्विंटल दर बाजरीला मिळाला. तर २८१ क्विंटल आवक झालेल्या ज्वारीला किमान २,१०० ते कमाल ३,००० दर मिळाला.

अन्य पिकांचे दर, त्यासमोर त्यांचा किमान व कमाल प्रतिक्विंटल दर व कंसात पिकाची आवक किंटल याप्रमाणे –

उडीद – ३००० ते ४००० (४)

हरभरा – ४००० ते ५८०० (१५९)

मका – १८०० ते २३२६ (१०६)

घेवडा – ३५०० ते ७००० (८६)

तूर – ५५०० ते ६२५० (४)

मुग – ४००० ते ४००० (१)

लाल मिरची – ६००० ते ६००० (१)

Spread the love