दि. १६ रोजी सुभेदार मल्हारराव होळकर यांची ३३२ वी जयंती; मुरुम येथे प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार अभिवादन

। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।

वैभवशाली होळकर शाहीचे संस्थापक, इंदौर नरेश सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या ३३२ वी जयंती रविवार, दिनांक १६ मार्च २०२५ रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे जन्मस्थळ असलेल्या फलटण तालुक्यातील मुरुम येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सकाळी १० : ३० वाजता अभिवादन कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभुराज देसाई, क्रीडा मंत्री ना. दत्तामामा भरणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खा. धैर्यशील मोहिते – पाटील, खा. नितीन पाटील, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. सचिन पाटील, आ. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे, आ. अतुल भोसले, आ. उत्तमराव जानकर, आ. नारायण पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ. बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार दीपक चव्हाण, रामहरी रुपनवर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृष्णाखोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर (कोल्हापूर), श्रीमंत अमरजितराजे बारगळ (जहागिरदार, तळोदे संस्थान), सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जयंती महोत्सव समिती – मुरुम, अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था – पुणे, सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती, अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती – फलटण, ग्रामपंचायत – मुरुम यांच्यावतीने करण्यात आले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश कुंभार, गटशिक्षण अधिकारी किरण सपकळ यांनी केले आहे.

Spread the love