ध्यास फाऊंडेशनकडून उद्या सातार्यात पुरस्काराचे वितरण
। लोकजागर । फलटण । दि. १५ मार्च २०२५ ।
ध्यास फाऊंडेशन, सातारा यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा ‘दीपस्तंभ नारी सन्मान पुरस्कार’ येथील सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कांचनकन्होजा खरात यांना जाहीर झाला आहे. उद्या रविवार, दिनांक १६ रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल इलाईट, वाढे फाटा, सातारा येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या महिलांचा यथोचित सन्मान ध्यास फाऊंडेशन, सातारा यांच्यावतीने केला जातो. त्यानुसार त्यांनी यंदाच्या पुरस्कारासाठी अॅड. कांचनकन्होजा खरात यांची निवड केली आहे. अॅड. खरात यांच्यासह डॉ. शुभांगी गायकवाड (सातारा), श्रीमती शैला वसंत यादव (औंध), सौ. कुमुदिनी जगदीश पांढरे (सासवड), सौ. विमल चिंतामणराव मुंडे (रायगड), डॉ. नीलम दिलीप शिंदे (सांगली), सौ. हेमलता किसन फडतरे (खटाव), अॅड. सुचित्रा घोरगे – काटकर (सातारा) यांचा समावेश आहे.
हा पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शमाकांत शेडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तराळकर, शिंदे फर्निचरचे प्रोप्रायटर वसंत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ध्यास फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. वैजयंती ओतारी यांनी केले आहे.