। लोकजागर । नवी दिल्ली । दि. १६ मार्च २०२५ ।
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनाची विनंती मान्य केल्याबद्दल या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, खा. शरद पवार यांनी आभार मानले आहेत.

खा. शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावे अशी अनेकांची भावना आहे. तरी नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या तालकटोरा स्टेडियमवर हि शिल्पं स्थापित करण्यासाठी, आवश्यक परवानग्या देण्यासाठी, दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला निर्देश देण्यासाठी पंतप्रधान महोदयांनी सहयोग करावा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.