। लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२५ ।
स्टेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉइज फलटण आगार को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि; फलटण च्या सन २०२५ – २०३० या कालावधीसाठी पार पडलेल्या संचालक मंडळ निवडणूकीत कामगार संघटना पुरस्कृत श्रीराम पॅनेलने पॅनेल प्रमुख निलेश बोधे यांच्या नेतृत्त्वात सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत तुळजाभवानी पॅनेल व परिवर्तन पॅनेल विरोधात दणदणीत विजय मिळवला.

विजयी उमेदवारांमध्ये निलेश बोधे (ताथवडा), विलास डांगे (भाडळी बु.), नवनाथ पन्हाळे (वाठार निंबाळकर), उमेश निंबाळकर (वाठार निंबाळकर), नितीन शिंदे (तांबवे), राहुल जाधव (फलटण), दादासो माने (भाडळी बु.), दत्तात्रय कोळेकर (नांदल), महेश गोसावी (आंदरुड), निराप्पा वाघमोडे (खटकेवस्ती), सौ. आशा जगताप (सुरवडी), सौ. सारिका गोवेकर (गारपीरवाडी), सुरेश अडागळे (जिंती), अनिल भोसले (घाडगेवाडी), हिंदूराव करे (कापडगाव) यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेखर साळुंखे यांनी कामकाज पाहिले.
कामगार संघटनेचे नेतृत्व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या कार्यशैलीवर कामगारांनी भक्कम असा विश्वास दाखवून पूर्ण पॅनल बहुमताने विजयी केले आहे. या विजयासाठी केंद्रीय उपाध्यक्ष तथा सातारा विभागीय अध्यक्षशिवाजीराव देशमुख, सातारा विभागीय सचिव अजित पिसाळ, विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घोणे, विभागीय संघटक सचिव सुशांत मोहिते, विभागीय खजिनदार प्रकाशराव पाटील, माजी बँक संचालिका सौ.लाडूताई मडके यांनी अथक प्रयत्न केले. फलटण आगार सचिव योगेश भागवत, अध्यक्ष बाळासाहेब सोनावले, कैलास काटे, बापूराव कोलवडकर, निराप्पा वाघमोडे, निलेश बोधे सुरेश अडागळे, देविदास निंबाळकर, गणेश सावंत तसेच सर्व सभासद बंधूंनी निवडणूक यशस्वी पार पडण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याचे विजयी उमेदवारांकडून सांगण्यात आले.