। लोकजागर । मुंबई । दि. १७ मार्च २०२५ ।
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ, हा विश्वास बहिणींना देत आहे. या योजनेतून दरमहा १५०० रुपयांची थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचे एक मोठ पाऊल शासनाने उचलले असल्याचा असल्याचा विश्वास सन 2025- 26 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
लाडकी बहिण योजनेच खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. सुमारे ४५ हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून महिला सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
