२४ मार्च रोजी विभागीय व जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन

। लोकजागर । सातारा । दि. १९ मार्च २०२५ ।

समाजिक न्याय विभागामार्फत दिनांक २४ मार्च रोजी विभाग व जिल्हास्तरावर ऑनलाईन लोकशाहीचे दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १०० दिवस कृती आराखडयाच्या अनुषंगाने व विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी ऐकण्याकरीता विभागीय स्तरावर ऑनलाईन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची लिंक नंतर देण्यात येईल.तसेच सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,सातारा या कार्यालयाशी सबंधीत योजना व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा कार्यालयाशी संबधीत प्रकरणाबाबत संयुक्तरित्या लोकशाही दिन २४ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता सामाजिक न्याय भवन सातारा येथे आयोजित केला आहे.

विभागीय व जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या अनुषंगाने प्रस्तुत कार्यालयाशी सबंधीत योजनांबाबत तक्रारी,गाऱ्हाणी दाखल करण्यासाठी २४ मार्च रोजी सकाळी ११.३० वा.सामाजिक न्याय भवन परिसर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन मध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री सुनिल जाधव यांनी केले आहे

Spread the love