भावाच्या वाढदिवसानिमित्त फलटणमधील फिरस्त्या जनावरांसाठी भेट दिल्या पाण्याच्या कुंड्या

सुखकर्ता सामाजिक संस्थेच्या उपक्रमाला सातारच्या नलावडे बंधूंची मदत

। लोकजागर । फलटण । दि. २१ मार्च २०२५ ।

सातारा येथील निलेशभैय्या नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू शुभम नलावडे, नवनाथ नलावडे आणि अमोल जाधव यांनी फलटणच्या सुखकर्ता सामाजिक संस्थेकडे फिरस्त्या जनावरांसाठी पाण्याच्या कुंड्या भेट देवून सामाजिक आदर्श घालून दिला.

फलटण येथील सुखकर्ता सामाजिक संस्थेकडून दरवर्षी उन्हाळ्यात फिरस्त्या जनावरांसाठी शहरात ठिकठिकाणी कुंड्यांमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाते. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाला मदत म्हणून निलेशभैय्या नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बंधू शुभम नलावडे, नवनाथ नलावडे आणि अमोल जाधव यांनी 15 पाण्याच्या कुंड्या संस्थेकडे सुपुर्द केल्या.

‘‘सुखकर्ता सामाजिक संस्थेकडून फलटण शहरातील विशेषत: मोकाट गायींसाठी उपचार, बचाव आणि अन्य सेवा सुविधा आपुलकीने आम्ही पुरवत असतो. शहरातील मोकाट जनावरांना पाण्याची सोय व्हावी म्हणून नलावडे बंधूंनी दिलेल्या कुंड्या फलटण शहरात लावण्यात आल्या असून सद्यस्थितीत शहरात एकूण 40 कुंड्या जनावरांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत’’. अशी माहिती सुखकर्ता संस्थेचे प्रमुख शाम पवार यांनी सांगितले.

Spread the love