ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते ‘लोकशाही भारत न्यूज नेटवर्क’ वर्धापन दिन विशेषांकाच्या कव्हर पेजचे अनावरण

। लोकजागर । फलटण । दि. २२ मार्च २०२५ ।

येथील ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते ‘लोकशाही भारत न्यूज नेटवर्क’च्या वर्धापन दिन विशेषांकाच्या कव्हर पेजचे अनावरण करण्यात आले.

‘‘नेत्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेचे प्रश्न आपल्या माध्यमातून मांडत जावा असे रविंद्र बेडकिहाळ नेहमी पत्रकारांना विविध कार्यक्रमांमध्ये संबोधित करत असताना सांगत असतात. ‘लोकशाही भारत’ ला त्यांचे नेहमी योग्य मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चवदार तळे सत्याग्रह दिनाला तिसर्‍या वर्धापन दिन विशेष अंकाच्या कव्हर पेजचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले असल्याचे’, ‘लोकशाही भारत न्यूज नेटवर्क’ चे संपादक सागर चव्हाण यांनी सांगितले.

‘‘ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य पदी यापूर्वी काम पाहिले आहे. त्यांया अथक प्रयत्नामुळे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ सन्मान योजना अंतर्गत मासिक सन्मान निधी वाढून 20 हजार रुपये करण्यात आला आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते ‘लोकशाही भारत न्यूज नेटवर्क’च्या वर्धापन दिन विशेष अंकाच्या पुस्तिका कव्हर पेजचे अनावरण करण्यात आल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे’’, असेही सागर चव्हाण यांनी सांगितले.

Spread the love