सुरवडीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कमिन्स इंडियाच्या माध्यमातून उभारलेल्या डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन
। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ ।
‘‘कमिन्स इंडिया कंपनीने दिलेल्या डिजिटल क्लासरूममुळे येथील न्यु इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. सुरवडी परिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आपण कटिबद्ध आहोत’’, असे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी सांगितले.

सुरवडी ता.फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयामध्ये प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक स्कूल कमिटी सुरवडी यांचे सहकार्याने कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचा उद्घाटन सोहळा कमिंस इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रेखा अनिल आणि प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कमिन्स इंडिया कंपनी कडून फारुख सुभेदार, प्रसाद कुलकर्णी, शिरीष भिडे, धनश्री घोडके, राजेंद्र माने, प्रवीण गायकवाड, सागर मगदूम आणि सुप्रिया चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना, ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात योगा करणे, तंदुरुस्त राहणे आणि चांगले संस्कार जोपासाणे ही त्रिसूत्री अवलंबावी’’, असे रेखा अनिल यांनी सांगितले.
विद्यालयाच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
कार्यक्रमास जितेंद्र साळुंखे पाटील, सूर्यकांत पवार, रणजीत साळवे, श्रीरंग पवार, बाळासाहेब जगताप, विलास गाडे, विशाल गाडे, नितीन जाधव, रवींद्र साळुंखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. घाडगे, सर्व शिक्षक आणि आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य आणि गणेश वंदना केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि सहकारी यांनी प्रयत्न केले. विजय साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. श्री.सोनवले यांनी आभार मानले.