शिक्षक अभियोग्यता “टेट” परिक्षेचे मे,जुन मध्ये आयोजन

। लोकजागर । फलटण । दि. २७ मार्च २०२५ ।

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शांळामध्ये पवित्र या संगणीकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२५ या परिक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन मे व जुन २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे.तरी पात्र उमेदवारांनी सदर परिक्षेबाबत आवश्यक ती पुर्वतयारी करावी.परिक्षेबाबतची अधिसुचना महाराष्ट्र राज्य परिक्षा परीषदेच्या www.mscepune.in या सकेंत स्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.तरी इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र परिक्षापरिषद पुणे यांनी केले आहे.

Spread the love