महात्मा बसवेश्वर सामाजिक समता – शिवा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन

। लोकजागर । फलटण । दि. २७ मार्च २०२५ ।

राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी वैशाख शुध्द (अक्षय तृतीया) या दिवशी महात्मा बसवेश्वर यांच्या नावे एक व्यक्ती व एका संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता लिंगायत समाजाकरिता पुरस्कार जाहीर केला जातो. या पुरस्कारासाठी ९ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.

सदर पुरस्कार हा वीरशैव लिंगायत समाजाकरीता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, समाज संघटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे समाजसेवक, कलावंत समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था यांना प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी पुरूष वयोमर्यादा किमान ५० वर्ष तर महिला किमान ४० वर्ष असून सामाजिक संस्थेसाठी सदर क्षेत्रातील किमान १० वर्ष कार्य केलेले असल्याचा निकष आहे. इच्छुक व्यक्ती आणि संस्था यांनी ९ एप्रिल, २०२५ पर्यंत प्रस्ताव एकूण ४ प्रतिमध्ये विहीत नमुन्यात सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा या कार्यालयामध्ये सादर करावेत.

Spread the love